नाशिक मिरर वेबटीम : छावा क्रांतिवीर सेने च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये गुप्ता गार्डन मध्ये नाशिक मधील शेकडो युवकांनी जाहीरपणे प्रवेश केला. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे , युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग, केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, प्रदेश संघटक नितीन सातपुते, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे , प्रदेश युवक सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश युवा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, आयटी प्रदेशाध्यक्ष किरण बोरसे,नाशिक जिल्हाध्यक्ष विजय खर्जूल, यांच्या उपस्थितीमध्ये सदर प्रवेश सोहळा व वर्धापन दिन संपन्न झाला. संघटनेमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेमधील नाशिक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे ,शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे , यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी छावा क्रांतिवीर सेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटनेचे विचार संघटनेचे विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काम करायचे आहे. यावेळी संघटनेचे सर्व नियमावली ह्या तरुणांनी समजून घेतली.तसेच संघटनेला बाधा येईल ,असे कुठलेही कृत्य करणार नाही. असे आश्वासन प्रवेश करणार्या तरुणांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच यानंतर दिलेल्या बाबदारीचे भान ठेवून अनेक नवीन लोकांना संघटनेत सहभागी करू व गाव तिथे शाखा अभियान मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये राबवण्याचे आश्वासन देखील यावेळी प्रवेश करते, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांनी उपस्थित सहकाऱ्यांच्या वतीने दिले. येणाऱ्या काळामध्ये मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण ,नांदगाव ,येवला, पेठ, सुरगाणा, नवीन नाशिक, सातपूर- गंगापूर या भागांमध्ये संघटनेचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची ही संधी मिळालेली आहे त्या संधीचे सोने करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी छावा क्रांतीवीर सेनेच्या पुढील नियुक्त्या नाशिक गेस्ट हाउस येथे युवराज छत्रपती संभाजी राजे ,संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे ,जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, संपर्कप्रमुख नितीन शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या.
