धुळे : नाशिक मिरर वेबटीम
शहरातील नटराज चित्र मंदीराजवळील वसाहतीजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असुन या जमावाने दोन बुलेट मोटार सायकली पेटवुन नुकसान केले असुन दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नटराज चित्र मंदीर परीसरात गेल्या काही दिवसांपासुन दोन गटांमधे धुसफुस सुरु होती. त्यातच रेडा बांधुन ठेवल्याच्या कारणावरुन या दोन्ही गटांमधे हाणामारीची घटना घडली आहे. जुनेधुळे भागात रहाणारे वाडीले यांनी त्यांच्या मालकीचा रेडा नटराज चित्र मंदीराजवळ काही लोकांनी बांधुन ठेवल्याची माहीती मिळाली. त्यानुसार मनोज वाडीले , दिलीप वाडीले व राकेश वाडीले हे चार ते पाच जणांबरोबर याठिकाणी आले. त्यांनी रेडा बांधणा-या जमावाला जाब विचारला. यावेळी रेडयाच्या धडकेने काही तरुण जखमी झाल्याने रेडा बांधल्याचे संबंधीतांनी सांगीतले. पण या नंतर या दोन्ही जमावांमधे बाचाबाची वाढतच गेली. यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. ही हाणामारी होत असल्याने वाडीले यांच्या दोन बुलेट मोटार सायकलींवर दगडफेक करुन गाडया पेटवुन देण्यात आल्या. पण काही लोकांनी या गाडयांची आग विझवली. दरम्यान या हाणामारीची माहीती कळाल्याने अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी व आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोकरे हे घटनास्थळी पोहोचल्याने जमावाने पलायन केले. तर वाडीले गटाच्या दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासदर्भात मख्ताक शाह , गुलाब शह , शरीक शाह सलीम शाह , वसीम अली निसार अली , साजिद शाह हैदर शाह , शेख मुश्ताक शेख हनीफ , गणेश सोनार , रईस मस्तान मोमीन , समिर अन्सारी मोहमद सुभान , मुजम्मील हुसेन अहमद हुसेन अन्सारी , यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन वाडीले गटातील जमावा विरोधात देखिल दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
