नाशिक मिरर वेबटीम : श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड-१९ संदर्भीय रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत, सप्तशृंगगड यांनी जा क्र ०४/२०२१ नुसार जनता कर्फ्यु संदर्भात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक व भाविक वर्गाच्या आरोग्य व जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा ही गुरूवार दि. ०१/०४/२०२१ पासून सोमवार, दि. ०५/०४/२०२१ पावेतो संपूर्णतः बंद असतील. मात्र श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल .
तरी भाविकांनी सदर नोंद घेवून विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच सप्तशुंगगड हे सर्वञ बंद असेल बंद काळात कोणी दुकाने उघडली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच विनाकारण गावात फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे तरी सप्तशुंगी मातेचे मंदिर हे या दिवसात बंद करण्यात आली आहे.
