नाशिक मिरर वेबटीम : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एससीबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले. असल्याने सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करून निवेदन देण्यात आले. या मुळे परिसर दुमदुमून गेला.
नाशिक येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महावितरण विभागात उपकेंद्र सहायक पदासाठी काल भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या अनुषंगानेकाल व दि.२ डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी आपल्या कार्यालयात होत आहे.परंतु या कागदपत्रे पडताळणी मधून मराठा समाजातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय होत आहे. आपणास विनंती की,एसई बीसी प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी.मराठा समाजातील मुलांना भरती प्रक्रियेत डावलल्यामुळे डावलून मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे.या विरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची तीव्र भावना होत आहे. महावितरणच्या उपरोक्त कृतीचा सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून उपरोक्त चूक तात्काळ सुधारण्यात यावी. अन्यथा मराठा समाजातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान दि.२९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयास अनुसरून सदर न्याय्य मागणीसाठी अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालय येथे सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.कृपया या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. या संदर्भात अधीक्षक अभियंता यांना निवेदन देतांनाछावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा चे नाशिक चे समन्वय करण गायकर, व गणेश कदम,राजू देसले, उमेश शिंदे,ज्ञानेश्वर थोरात, विजय खर्जुल, ज्ञानेश्वर भोसले,गणेश दळवी, ऋषिकेश कदम,शुभम बोराडे, विशाल नवले, ओम गाडेकर आदी पदाधिकारीसह विद्यार्थी उपस्थित होते.
