नाशिक मिरर वेबटीम : पहिली मुलगी धनांची पेटी, असे बोलून आता सर्वीकडे मुलींचे घरात आनंदाने स्वागत केले जाते.परंतु नाशकात पहिला मुलगा हवा परंतु मुलगी झाली म्हणून चक्क चारमहिन्या च्या आईला मारहाण करून बाळा सह घरातून काढून दिले. सदर घटना नाशिकच्या चांदशी या भागात महिलेला मुलगी झाल्याने तिला मारहाण करून माहेरी पाठवल्याची घटना समोर आली आहे.लग्नानंतर पहिला मुलगाच हवा, असा आग्रह धरणाऱ्या पती व सासू-सासऱ्यांनी मुलगी झाल्याचा राग आल्याने सुनेला चार महिन्यांची बाळांतीण असतानाच मारहाण करत माहेरी सोडून दिल्याची धक्कादायक घटना चांदशी (ता. नाशिक) येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनुसार देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील दिनेश भिमराज सोनवणे व त्याच्या कुटुंबियांविरोधात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिता भारती सोनवणे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पती दिनेश सोनवणे, सासरा भिमराज महादू सोनवणे, सासु शोभा सोनवणे व दीर राहुल (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) व नणंद दीपाली किशोर ठाकरे (रा. कल्याण) यांनी मुलगी झाली त्या दिवसापासून आम्हाला मुलगाच पाहिजे होता, यावरून कुरापत काढत तुला स्वयंपाक येत नाही. माहेरून दोन लाख रुपये आणले तरच परत घरी ये, असे म्हणत माझ्या घरी येऊन मला मारझोड केली. शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गुह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जाधव करीत आहेत. पीडितेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींना अटकेची मागणी केली आहे.

Don`t copy text!