नाशिक मिरर :  सातपूर औद्योगिक वसाहती मधील
शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १७ जून २०२२ पासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली असून संकेतस्थळावर प्रवेश पध्दती नियमावली उपलब्ध करून देण्यात आली आहे.सातपूर आयटीआय मध्ये एकूण २७ विविध कोर्स साठी एकूण १ हजार ३३२ जागा उपलब्ध असून,कोर्स नुसार १ ते ३ सत्र मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रणाली व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती, निश्चिती करता येईल. प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे. अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाच यूजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी १०० रु. आहे तर खुल्या प्रवर्गासाठी रु १५० आहे. प्रवेश अर्जातील माहितीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक मुळ / कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा संच सोबत असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेरी करता विचार करण्यात येईल. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन निवड पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे लागेल. दि. २२ जून पासून अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https: / /www.dvet.gov.in या संकेतस्थळांला भेट द्यावी. युवकास आवश्यक असलेले पायाभूत व्यवसाय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आलेली आहे. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. राज्यातील शासकीय औ.प्र. संस्थांतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, On the Job Training, रोजगाराच्या संधी,
प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करून देणे, इतर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत आहेत.
अ. प्र. संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणान्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणार्थ्यासाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजना, रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या admission.dvet.gov.in. संध्या उपलब्ध झाल्या आहेत. अ.प्र. संस्थांमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धत राबविण्यात येत आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती या बाबत विस्तुत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका प्रवेश संकेतस्थळ https:/ /admission. dvet.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.सदर माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सातपूर शास. औ. प्र. संस्थेचे प्राचार्य राजेश मानकर यांनी दिली.यावेळी उपप्राचार्य सी.बी.बुरकुल, गटनिर्देशक प्रशांत बडगुजर, आयएमसी चेअरमन सुधीर पाटील उपस्थित होते.

सातपूर आयटीआय च्या वतीने प्रवेश

प्रक्रिया बाबत ची माहिती, कोर्स बाबत ची माहिती व प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर भविष्यात मिळणाऱ्या विविध सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थपणा मध्ये मिळणाऱ्या संधी बाबत दर गुरुवारी ऑनलाइन , शुक्रवारी ऑफलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधील कोर्स व उपलब्ध जागा

१.सुतार -४८ जागा
२.संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग -७२ जागा
३.फाउंड्रीमॅन -४८ जागा
४.मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) -२४ जागा
५.मेकॅनिक डिझेल-७२ जागा
६.प्लास्टिक प्रक्रिया ऑपरेटर-६०जागा
७.प्लंबर -२४ जागा
८.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-२०जागा
९.शीट मेटल कामगार-४० जागा
१०.स्टेनो इंग्लिश-४८जागा
११.वेल्डर-६० जागा
१२.ड्राफ्ट्समन मेकॅनिकल -४०जागा
१३.इलेक्ट्रिशियन -६०जागा
१४.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक-४८जागा
१५.फिटर -८०जागा
१६.आयटी – २४जागा
१७.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक -२४जागा
१८.मशिनिस्ट – ८०जागा
१९.मशीनिस्ट ग्राइंडर- ६०जागा
२०.मेकॅनिक मशीन टूल्सची देखभाल – २४जागा
२१.मेकॅनिक मोटार वाहन -४८जागा
२२.मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर – ४८ जागा
२३.ऑपरेटर अॅडव्हान्स मशीन टूल्स-३२जागा
२४.टूल आणि डाय मेकर (प्रेस टूल्स, जिग्स आणि फिक्स्चर) – ४८ जागा
२५.टर्नर – १२० जागा
२६. वायरमन- ६० जागा
२७ चित्रकार (सामान्य)- २० जागा
एकूण :- १ हजार ३३२ जागा

बातम्या

Don`t copy text!