नाशिक मिरर वृत्तसेवा :

अखिल भारतीय माळी महासंघ, नाशिक आणि स्पेक्ट्रम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून, सर्कल सिनेमा समोर, अशोक स्तंभ, नाशिक येथे कार्यक्रम होणार आहे.

यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या शासकीय योजनांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये इयत्ता ८वी, ९वी, १०वी, १२वी तसेच पदवी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विविध शैक्षणिक व करिअर विषयांवर सखोल माहिती दिली जाणार आहे.

कार्यक्रमात JEE, NEET, CET, UPSC, MPSC, SSC, IBPS, NET-SET, मिलिटरी, MBA-CET, वैमानिक प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच Ph.D. पूर्व प्रशिक्षण योजना यांसारख्या विविध क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय महाज्योती शासकीय योजना म्हणजे काय, तिचा लाभ कसा घ्यावा, विविध शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजना, आर्थिक सहाय्य योजना, अर्ज प्रक्रिया, CET प्रवेश परीक्षा आणि निवड प्रक्रिया कशी केली जाते याची माहितीही उपस्थितांना दिली जाणार आहे.

कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना ₹६,००० ते ₹१२,००० पर्यंत आकर्षक विद्यावेतन, पुस्तक संच, तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब यासारख्या सुविधांबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यशाळेसाठी इच्छुकांनी Google Form द्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी :

श्री. ज्ञानेश्वर सोमवंशी – 9096567412

श्री. विकास सोनवणे – 9096080879

श्री. महेश ढोले – 9923753147

श्री. संतोष जेंजुरकर – 7722017220

विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा आणि शासकीय योजनांची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध करून देणारी ही कार्यशाळा विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बातम्या

Don`t copy text!