नाशिक मिरर वेबटीम :
धुळे जिल्हयातील चार तालुक्यांमधील 541 गावांमधील  सरपंच पदाचे आरक्षण आज सोडतीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. पण या आरक्षणानंतर सर्वच ग्रामपंचायतींमधे घडले बिघडल्याची प्रतिक्रीया उमटली आहे. बहुसंख्य गावांमधे पॅनल प्रमुखांच्या आशेवर पाणी पडले आहे.धुळे जिल्हयातील 541 ग्रामपंचायतींसाठी आज आरक्षण ठरवण्यात आले. यात धुळे तालुक्यात 131, साक्री तालुक्यातील 169, शिरपुर तालुक्यातील 118 , शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींसाठी सोडत काढण्ण्यात आली. यात लोकसंख्येनुसार अनुसुचित जातींसाठी 23 पैकी 12 महीला , अनुसुचित जमातींसाठी 77 पैकी 39 महीलांसाठी , अनुसुचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत151 पैकी 76 महीला,  नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 105 पैकी 53 महीला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 185 पैकी 93 जागा महीलांसाठी आरक्षीत करण्यात आल्या. धुळे  तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरवण्यासाठी जेल रोड वरील तांत्रिक विदयालयात कार्यवाही करण्यात आली. यात मौजे सरवड येथे अनुसुचित जमाती महीला,मोराणे प्र नेर येथे अनुसुचित जमाती , चिंचवार येथे सर्वसाधारण तर मळाणे ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरीकांचा मागास प्रवर्गातील महीला असे आरक्षण 2015 ते 2020 या कालावधीसाठी ठरवण्यात आले होते.तथापी काही कारणांमुळे या आरक्षणाचा लाभ या ग्रामपंचायतींना दिला गेला नसल्याने त्यांचे आरक्षण पुर्वीचेच कायम करण्यात आले.यानंतर सात ग्रामपंचायतीत अनुसुचित जात प्रवर्गातील सरपंचांचे आरक्षण ठरवण्यात आले. याचा लाभ नगाव , जापी , नंदाळे बुदुक , हडसुणे , वडगाव , निमडाळे , रामी या गावांचा समावेश आहे.त्यानंतर 23 गावांमधे अनुसुचित जमाती सरपंच पद आरक्षीत झाले.तर नागरीकांच्या मागास प्रवर्गातील 36 जागांवर आरक्षण काढण्यात आले. धुळयात आठवीतील विदयार्थी दिपक झिपरे याच्या हातुन चिठठया काढण्यात आल्या. धुळे तालुकयातील नगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे या गावातील उपस्थित ईच्छुकांनी आनंद व्यक्त केला. पण अन्य प्रवर्गातील ईच्छुकांना धक्का बसल्याची प्रतिक्रीया वर्तवण्यात आली. तसेच आर्वी , गरताड व शिरुड ग्रामपंचायतील खुल्या प्रवर्गातील सरपंच होणार असल्याचे या सर्व ठिकाणी सरपंचपदासाठी चुरस वाढली आहे. ईच्छुकांनी आजपासुनच मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या

Don`t copy text!