नाशिक मिरर वेबटीम : 
प्रजासत्ताक दिनानिमित्त निवेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे निवेक प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धेत लीलावती प्राइड संघाला विजेतेपद पटकावले. तर आर.डी. लीगल रॉयल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेतेपदासाठी लीलावती प्राइड संघ व आर.डी. लीगल रॉयल या दोन संघादरम्यान चांगलीच चुरस दिसून आली. या अटीतटीच्या अंतिम लढतीत लीलावती प्राइड संघाने जोमाने खेळ करून विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. लीलावती प्राईड संघाकडून खेळताना संघाचे मालक डॉ प्रसाद निकम याने खेळात सातत्य राखत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. संघाचे मालक आर.डी देशमुख  यांनीही आर. डी. लीगल रॉयल संघाकडून खेळताना चांगले प्रदर्शन करून आपल्या संघाला हातभार लावला.  या स्पर्धेत डॉ. प्रसाद निकम यांनी लीलावती प्राइड या संघाचे प्रतिनिधित्व केले तर आर.डी. देशमुख ने आर.डी.लीगल रॉयल या संघाचे प्रतिनिधित्व केले.
रात्री उशिरा सामने संपल्यानंतर विजेत्यांना पूरस्कृत करण्यात आले यावेळी निवेक अध्यक्ष संदिप गोयल उपाध्यक्ष जनक सारडा, सरचिटणिस रणजित सौंध, अशोक हेंबाडे, श्रीकांत कुमावत, प्रणव संघवी, शैलेश वैश्य, स्वप्निल भामरे, तय्यब नुराणी,अजींक्य बच्छाव , अपूर्वा रोकडे   आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राजेंद्र सुर्यवंशी, प्रदिप नवले, समिर पाथरे आदींसह उद्योजक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
 स्पर्धेचा शुभारंभ नाशिकचे माजी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंसाठी व त्यांच्या पालकांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योजक जे.एम पवार, तुषार अंधृटकर, मधुकर ब्राम्हणकर, रमेश वैश्य , संजय बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निधीतून लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन पार्कचा शूभारंभ आ. सिमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नरेंद्र बिरार, महेश हिरे हे उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!