नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार रेल्वे ट्रॅक वर काम करतांना अचानक समोरून रेल्वे आल्यामुळे त्याखाली चिरडून एक रेल्वे कर्मचारी जागीच मरण पावला तर दुसऱ्याचे पाय कापले गेले. नवापुर तालुक्यात खांडबारा रेल्वे स्थानकानजीक आज सकाळी ही दुर्घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील नवापुर तालुक्यात खांडबारा रेल्वे स्थानका अंतर्गत रेल्वे रुळावर नेहमीप्रमाणे रेल्वे कर्मचारी काम करीत होते. हे काम चालू असताना आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी सकाळी 10 वाजता हापा विलास पुर ट्रेन (नंबर 09239) अचानक समोर आली. तेव्हा रुळावरुन बाजूला पळत असतांना रेलवे ट्रॅकमन ईसरीया जिवल्या गावित धावत्या रेल्वेखाली सापडून जागीच मरण पावले. तर जीव वाचवून पळणारे रंजीत वसावे यांचे पाय कापले गेले. दोन्हीही खांडबारा रेल्वे गँग नंबर २ चे हे कर्मचारी आहेत. ऐन होळीच्या दिवशी हा अपघात घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
