नाशिक मिरर वेबटीम : ३१ डिसेंबरला तळीरामांची धमाल ऊडवून देण्यासाठी गावोगावी मध्य विक्रेत्यांनी मद्य साठा जास्त असावा यासाठी अवैध मार्ग निवडले आहे. त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहीम राबवून जणू पाणी फिरवले. तीन ठिकाणी छापेमारी करीत ३ वाहनासह एकुण ६६,४८,००० पराज्यातील विदेशीमद्याचा मोठा साठा जप्त केला.
याबाबत दिलेल्या अधिकृत माहितीत म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक सी उषा वर्मा, विभागीय आयुक्त अर्जुन आहोळ, जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने खापर ते सागबारा रस्त्यावर मोरंजा फाट्याजवळ महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ ( GI – 06 CM – 5407) वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनामध्ये परराज्यातील विक्रीसाठी असलेले मद्याचे २० बॉक्स मिळुन आले . दोन आरोपिना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वाहनासह सहा लाख ४१ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला . तसेच अक्कलकुवा ते खापर रस्ता अक्कलकुवा बसस्थानकाजवळ दोन संशयीत वाहन टाटा कंपनीची ( DN09 M9294) पॅक बॉडी असलेला कटेंनवर व आयसर (MH04 FP3136 ) पॅक बॉडी असलेला कंटेनर या वाहनांची तपासणी केली असता वाहनामध्ये परराज्यातील विदेशी मद्याचे एकुण ५०६ बॉक्स व परराज्यातील बियरचे एकुण १४४ बॉक्स असा एकुण वाहनासह ६० लाख सहा हजार नऊसे रुपयांच्या मुद्देमाल मिळुन आला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली . दोन गुन्हे नोंद करण्यात आले. मुंबई दारुबंदी 1949 कायदाअंतर्गत कारवाई करण्यात आली.या आरोपींना सहा दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे . ही कारवाई प्रभारी निरीक्षक एम.एम.संबोधी , प्रशांत पाटील , अतुल पी . शिंदे ,बबन चोथवे तसेच वाहनचालक हेमंत पाटील , जवान अजय रायते ,.हर्षल नांद्रे , अविनाश पाटील यांनी केली.

बातम्या

Don`t copy text!