आ. सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून सभामंडप

नाशिक मिरर वेबटीम : श्री दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर सातपुर प्रभाग क्र. ९ विष्णु नगर येथील श्री दत्त मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमा हिरे, भाजपा शहर अध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका प्रा. वर्षा भालेराव, माधुरी बोलकर, महेश हिरे, रामहरी संभेराव, चारुदत्त आहेर, अनिल भालेराव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मनोगतात सांगितले की, महिलांसाठी ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, सभामंडप, तसेच परिसरातील धोकादायक विद्युततारा भुमिगत करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मतदार संघातील नागरिकांनी जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा तसेच शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ.हिरे यांनी सांगितले.यावेळी शहर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी अयोध्या मधील श्री राम मंदिरासाठी प्रत्येकाने आपल्यापरीने सुयोग्य देणगी स्वरुपात मदत करावी, असे आवाहन देखिल केले.तर अनिल भालेराव यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही नगरसेवकांच्या निधीतुन होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांचे अत्रिनंदन मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला . तर यावेळी ह. भ. प. दिगंबर महाराज खिरकाडे महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे भगवान काकड, राजेश दराडे, प्रा. तुषार पगार, रविंद्र उगले, खोटरे ताई, श्रीनिवास नामबियार यांच्यासह अत्रिनंदन मंडळाचे शाम उगले, संजय कोठावदे, दिलीप रासकर, चंद्रकांत कोठावदे, बाळासाहेब गांगुर्डे, सुनिल भालेराव, सुदाम गरुड,श्रीनाथ, प्रकाश पाटील, दत्तात्रय कोबरणे, राहुल पाटील, जाधव, रामप्रसाद पांडे, रवि खैरनार, राजेंद्र चव्हाण, अनिल घरटे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!