काळाबाजार करणाऱ्याची नागरिकां व नातेवाईक यांनी तक्रार करण्याचे आवाहन

नाशिक मिरर : नाशिक मधील हॉस्पिटलमध्ये बेड असतानाही रुग्णांना बेड देत नसेल,  मेडिकल, एजंट, एजन्सी चालक किंवा अन्य व्यक्ती रेमडीसीविरचा काळाबाजार करत असेल नागरिक व नातेवाईक यांनी पुढे येऊन तक्रार करावी, त्याला छावा क्रांतीवीर सेना छावा स्टाईल धडा शिकवेल, असे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आवाहन केले आहे. तसेच छावा चे युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग,नाशिक जिल्हाअध्यक्ष आशिष हिरे,नाशिक शहरअध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक मधील हॉस्पिटल, मेडिकलवाल्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने सापडत आहेत. त्याप्रमाणात रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना देखील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. रेमडीसीवर इंजेक्शनसाठी तर रुग्णाच्या नातेवाईकांना तासनतास मेडिकल बाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे. तरीसुद्धा हे इंजेक्शन मिळत नाही.त्या पार्श्वभूमीवर छावा क्रांतीवीर सेना यांनी रुग्णालय आणि मेडिकलवाल्यांना हा इशारा दिला आहे.

 

नाशिक मध्ये कोणी हॉस्पिटलमध्ये बेड असतानाही बेड देत नसेल, रेमडीसीवरचा जर कुणी मेडिकलवाला काळाबाजार करत असेल,हॉस्पिटल बिलात काही तफावत आढळली तर त्याला छावा क्रांतीवीर सेना छावा स्टाईल धडा शिकवेल कारण प्रशासन सुद्धा आता या सर्व गोष्टींवर अंकुश ठेवायला कमी पडत आहे. अनेक ठिकाणी लोक मोबाईलच्या द्वारे लाईव्ह करून परिस्थितीची जाणीव करून देत आहेत तरी त्या ठिकाणी प्रशासन काहीही पाऊल उचलताना दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झालेली आहे त्रस्त झालेली आहे काही डॉक्टर पेशंटला गरज नसतानाही रेमडीसीवर सारखे इंजेक्शन आणायला सांगत आहे त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा आमची विनंती आहे की ज्या पेशंटला खरोखर गरज असेल त्याच पेशंटच्या नातेवाईकांना ही इंजेक्शने आणायला सांगा विनाकारण पेशंटची पिळवणूक कोणीही करू नये असे कोणी करताना आमच्या निदर्शनास आले किंवा आमच्या कडे कोणी अशी तक्रार केली तर अशा लोकांसाठी आमच्याकडून
ही धमकी नाही, हि तुम्हा सर्वाना चेतावणी आहे,वेळ आलीच तर कायदाही हातात घेणार, कारण प्रशासनाला दिसूनही प्रशासन जर कारवाई करणार नसेल तर मग आम्हाला शिवछत्रपतींची शिकवण आहे जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याची त्यामुळे सर्वांनी या संकटाच्या काळी गोरगरीब जनतेचा गैरफायदा न घेता त्यांना मदत करावी ही आमची अपेक्षा आहे.
कोणास काही अडचण असल्यास छावा क्रांतीवीर सेनेच्या पदधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

संपर्क :
करण गायकर मो.9673754141,

शिवा तेलंग मो.9860354514,

आशिष हिरे .मो.9881737934,

योगेश गांगुर्डे मो.9850889458

बातम्या

Don`t copy text!