नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील श्रमिकनगर मधील त्र्यंबक – गंगापूर लिंकरोड वरील गायत्री स्वीट्स हे दुकान दि.२८ मार्च रोजी १० : ३० च्या वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पूर्ण भस्मसात झाले आहे.
सदर प्राथमिक माहिती नुसार शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे समजते आहे.घटनास्थळी जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी च्या अग्निशमन बंबाने आग विझवण्यास सुरुवात केली.आग इतकी भीषण होती की ती काही वेळात संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.स्वीट्स चे लाखो रुपये चा माल, फर्निचर जळून मोठे नुकसान झाले आहे.
सदर दुकान परिसरातील महत्वाच्या ठिकाणी असून देखील दुकानात आग प्रतिबंधत्मक कोणत्याही प्रकारची यंत्रणा नव्हती.सदर स्वीट्स जवळच शेजारी किराणा दुकान, मेडिकल, व इतर दुकाने होते. व वरती रहिवासी देखील होते.
