नाशिक मिरर : येथे गेल्या पाच वर्षांपासून पक्ष भेद विसरून थाटामाटात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव २०२२ समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संजय राऊत व  कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव यांची कोर कमिटीने आयोजित बैठकीत निवड करण्यात आली.विशेष म्हणजे बिनविरोधाची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सचिन गांगुर्डे व रुपाली गांगुर्डे या दांपत्यानी मनाचा मोठेपणा दाखवत माघार घेतली.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय व सर्व समाज समावेशक अशी ही निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जेष्ठ नगरसेवक सलीम शेख, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, नितीन निगळ, ऍड. महेंद्र शिंदे, करण गायकर, संजय जाधव, सचिन गांगुर्डे, महेश तुपे, राजेश खताळे, धिरज शेळके,रवी देवरे, निवृत्ती इंगोले, योगेश गांगुर्डे, समाधान देवरे,जीवन रायते, बाळासाहेब जाधव, देवा जाधव, दीपक लोंढे, पुंडलिक बोडके, लोकेश गवळी, बाळा जारे,गौरव जाधव, पंकज गुजर, भगवान काकड, हिरामण रोकडेसह विविध पक्षाचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

     योगेश गांगुर्डे यांचा मनाचा मोठेपणा
योगेश व रुपाली गांगुर्डे यांनी माघार घेत नात्याला मान देऊन बहीण भावाचे नाते जोपासले आहे माझी निवड सार्थकी ठरवेन. आम्ही खूप ऋणी आहोत आणि शिवजयंती महोत्सव न भूतो न भविष्यती असा जल्लोषात साजरा केला जाईल. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याची गरज आहे.

– गीता जाधव,कार्याध्यक्षा

बातम्या

Don`t copy text!