अखेर नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेच्या कामाचा नारळ बुधवारी फुटला आहे.

नव्या रचनेत 40 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 प्रभाग 2 सदस्यीय होण्याची शक्यता आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. . त्यासाठी कुणाच्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. नाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी. त्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही रचना करताना प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा जास्त केली तरी चालेल. प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी मात्र घ्यावी लागेल.

सध्याचे प्रभाग अशी राहील नवी प्रभाग रचना?
  • 29 प्रभाग 4 सदस्यीय
  • 2 प्रभाग 3 सदस्यीय
  • 40 प्रभाग 3 सदस्यीय
  • 1 प्रभाग 2 सदस्यीय

अश्याप्रकारे होणार प्रभाग रचना

प्रभाग रचना करताना उत्तर-पूर्व अशी केली जाणार आहे. त्यानंतर पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे रचना करत शेवट दक्षिण दिशेकडे होणार आहे. या गुंतागुंतीच्या रचनेत कोणाचा भाग कोणाला जोडतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक नगरसेवकांनी आधीपासून आपले देव पाण्यात ठेवत प्रचार सुरू केला आहे. काही कामे केली आहेत. मात्र, त्यांचा भाग ऐनवेळी दुसऱ्याला जोडला, तर त्यांच्यासमोरची चिंता वाढणार आहे.

या प्रभागांना रचनेनुसार क्रमांक दिले जातील. शक्यतो भौगोलिक सगलगात खंडित केली जाणार नाही. प्रभागातील दळणवळण, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, स्मशानभूमी, बाजाराच्या जागा, पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा, मैदाने इत्यादींचा वापर जिथे केला जातो, ते त्याच प्रभागात ठेवण्याची शक्यता आहे.

अश्याप्रकारे होतील प्रभाग महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात आहे. त्यानुसार 14 लाख 90 हजार 53 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचे 2807 प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. यातले जवळपास 50 ते 60 प्रगणक गट एकत्र करून त्यांचा एक प्रभाग तयार केला जाईल. त्यातून 41 प्रभाग अस्तित्वात येतील. त्यात 40 प्रभागात तीन आणि एका प्रभागात दोन सदस्यीय रचना राहणार आहे.

बातम्या

Don`t copy text!