शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या ७२ पैकी ५० विद्यार्थी ठरले पात्र
नाशिक मिरर वृत्तसेवा: निफाड एज्युकेशन सोसायटीच्या पिंपळगाव बसवंत हायस्कूल येथे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया विविध स्पर्धात्मक चाचण्यांद्वारे पार पडली .
भरतीसाठी विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील ७२ विद्यार्थी यात सहभाग घेतला होता मात्र उंची ,वजन ,रनिंग, पुशअप ,सीटअप आदींच्या शारीरिक दृष्टीने परिपूर्ण असलेल्या ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली असल्याची माहिती पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.जे.मोरे यांनी दिली.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी जुलै महिन्यात होणारी निवड प्रक्रिया जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. परंतु ती देखील कोविड मुळे झाली नाही. मात्र आता covid-19 चा प्रादुर्भाव कमी असल्याने या महिन्यात संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करुन एनसीसीच्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
एनसीसी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते . दरवर्षी देशभरात 13 लाखापेक्षा जास्त कॅडेट ची भरती करत असते.एनसीसीचे वाढते महत्त्व व एनसीसीच्या प्रमाणपत्रांचा उपयोग सैनिक भरती,पोलिस भरती, सुरक्षा बल भरती तसेच सरकारी नोकरी खाजगी कंपन्या इत्यादींसाठी होत असल्याने त्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढलेला आहे
या निवड प्रक्रियेत सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक येथील भारतीय सेनेतील नायब सुभेदार राकेशकुमार , हवालदार विष्णू वाघ तसेच राष्ट्रीय सेनेचे अधिकारी नितीन डोखळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बटालियनचे ऑफिसर कर्नल अलोक सिंग व ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसर कर्नल राकेश कौल यांनी शुभेच्छा दिल्या.
