नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सिकॉप गाळ्याजवळ एका मजुराचा रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या ऍक्टिवा या दुचाकीने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत रामचंद्र ननकु जांबेकर (वय ४२ रा.मालधक्का, नाशिकरोड)मूळ रा.ता.नेफानगर, जी.खंडवा, मध्यप्रदेश हे ट्रकने (एमएच ०४ एफपी ७१४५)
सातपूर येथे एका सिमेंट कंपनीत सिमेंट खाली करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर विजय सिध्दांत घोडे (रा.रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी,नाशिकरोड) सोबत हमाल म्हणून माल खाली करण्यास गेले होते. मयत रामचंद्र यांना भुक लागल्याने ट्रक ड्रायव्हरकडुन नाष्टा करण्यासाठी पन्नास रुपये घेतले. नाष्टा करून ट्रक च्या दिशेने येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या सफेद रंगाची एँक्टीवा दुचाकी चालकाणे रामचंद्र यांस जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. अपघात करणारा फरार असुन अधिक तपास सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सुकदेव काळे करित आहे.सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीत सदर फरार वाहन चालक सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
