स्मार्ट सिटी चा घातला घाट, नाशिककरांची लावली विल्हेवाट
नाशिक मिरर :
पाच वर्षांपूर्वी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत एका हाती सत्ता घेणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दत्तक बाप नसून जीव घेणारे जल्लाद ठरताय. अशोकनगर रस्त्यावर स्मार्टसिटीच्या नावाखाली सुरु असलेले दुभाजक अनेकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मात्र टक्केवारी आणि कमिशनच्या लोभापाई मतदार राजाचा बळी घेणाऱ्या या कामाविरोधात सत्ताधारी एकही ब्र शब्द बोलायला तयार नसून दत्तक पिता शांत का? असा सवाल उपस्थित करत नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांच्या विरोधात सातपूर शिवसैनिकांनी निदर्शने करत निषेध नोंदवला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल होऊन विविध विकास कामांचे उद्घाटन केले.
दरम्यान, समृद्धनगर ते बारदान फाटा रस्त्यादरम्यान दुभाजक टाकण्याचे काम सुरु आहे. संथ गतीने सुरु असलेल्या या कामामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले तर अनेकांना कायमस्वरूपी जायबंदिस सामोरे जावे लागले. मात्र स्थानिक नगरसेवक तथा प्रशासनाला याचे सोयरे सुतक नाही. दत्तक पिता म्हणून आपली जबाबदारी काय? असा सवाल उपस्थित करत अशोक नगर येथील अंबिका चौकात फडणवीस यांचा रास्ता रोको करत निषेध नोंदवला.यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी फलक दाखवण्यात आले.
यावेळी उपमहानगरप्रमुख देवा जाधव, विभागप्रमुख विलास आहेर, युवराज धाञक, गोकुळ नागरे, किशोर निकम, वैभव ढिकले, रणजीत हिंगमिरे, शांताराम कुटे, गोकुळ तिडके, विजय बिलकुल, गौरव जाधव, अतुल पवार, अशोक पारखे,संदीप भोजणे,साहेबराव जाधव,अलकाताई गायकवाड,विजय बिरकुल, अविनाश सोनवणे, राहुल साळुंके, हर्षल आहेर, योगेश बेदाडे, किरण निगळ,विनोद घरटे,विनोद जाधव, सोनु काळे, आप्पासाहेब डोमाळे,राहुल खरे,सेतू पाठक,सत्यम मिश्रा,सनी मिश्रा, योगेश गांगुर्डे,सुनिल मौले आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

