छत्रपती शिवरायांना समर्पित संगीत, नृत्य,आणि नाटक यांनी समर्पित सजलेला गर्जते मराठी महानाट्य
नाशिक मिरर :
सातपूर शिवजन्मोत्सव समिती तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त दि.१८ व १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सातपूर मधील सर्व शिवप्रेमी गेल्या ३ वर्षांपासून पक्षाचे झेंडे व हेवेदावे बाजूला ठेवून सातपूर परिसरात एकत्रित मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे.
यानिमित्त सातपूर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज दि.१८ रोजी एसएमबीटि वैद्यकीय महाविद्यालयातच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान आरोग्य शिबीर, सायंकाळी ७ वाजता राष्ट्रशिवशाहीर सुरेश जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, रात्री साडेदहाच्या दरम्यान छत्रपती शिवरायांचा पाळणा,रात्री १२ वाजता युवराज छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आरती संपन्न होणार असून शनिवारी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक ते शिवाजी महाराज पुतळा शिवपालखी, शिवपूजन सायंकाळी ७ वाजेनंतर जाणता राजा मैदान सावरकरनगर येथे छत्रपती शिवरायांची आरती, त्यानंतर छत्रपती शिवरायांना समर्पित संगीत, नृत्य,आणि नाटक यांनी समर्पित सजलेला गर्जते मराठी महानाट्यचे आयोजन केले आहे.यामध्ये तब्बल ५० ते ७० कलाकार आपली कला सादर करून शिवप्रेमी च्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.महोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सातपूर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.शिवजयंती महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन समितीच्या वतीने सूचना करण्यात आल्या असून महोत्सवा सातपूर परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सातपूर सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समिती वतीने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे.
सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी किल्ले रायगड येथून राजे छत्रपती खासदार संभाजी महाराज यांच्या हस्ते माती संकलन करून माती चा कलश दर्शनासाठी सातपूर येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा प्रत्येक वर्षी उत्साहात पार पडत असतो , दरवर्षी स्वराज्यातील वेगवेगळ्या गड किल्ल्यावरील माती शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आणली जाते ,दरवर्षाप्रमाणे या सोहळ्याला रायगड येथील माती आणण्याचे जबाबदारी अध्यक्ष संजय राऊत व कार्याध्यक्ष गीता संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने ठरवले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी किल्ले रायगड येथील माती आणण्याची जबाबदारी संदीप तांबे ,डॉ अमोल वाजे व सहकारी यांनी घेतली होती , आजचे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे मातीचे संकलन छत्रपती घराण्याचे वंशज राजे छत्रपती खासदार संभाजी महाराज यांच्या हस्ते किल्ले रायगड येथे झाले, यावेळी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य संदीप तांबे , डॉ अमोल वाजे , अशोक तांबे, नवनाथ भवर , दिगंबर घाटे हे उपस्थित होते.

