एसटीपी प्रकल्प चुकीच्या जागेवर
नाशिक मिरर : गंगापूर येथील एसटीपी प्रकल्पामुळे (मलनिस्सारण केंद्र) तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, नदीपात्र पान वेलीने आच्छादल्यामुळे त्याखालील सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. देश विदेशातील भाविकांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे पावित्र्य कायम राखत गोदावरीचे जल हे तीर्थ जल म्हणूनच राहू द्या अन्यथा विश्व हिन्दू सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा विश्व हिंदू सेनेचे संस्थापक ॲड.महेंद्र शिंदे यांनी दिला आहे.
ब्रम्हगिरी त्रंबकेश्वर येथुन उगम पावणारी गोदावरी नदी हि नाशिक शहरातुन महराष्ट्राच्या इतर जिल्हातुन तेलगंणा , छत्तीसगढ़ व आधप्रदेश या राज्यातून सुमारे १ हजार ४६५ किमी अंतर वाहत जाऊन पुढे बंगालच्या खाडीत जावुन मिळते. नाशिक येथे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जगभरातुन भाविक येतात. पवित्र गोदावरी नदीचे दर्शन घेवून स्नान करतात व पवित्र गोदावरीचे पाणी तिर्थ म्हणुन बरोबर घेवून जातात. गोदावरी नदिकाठी बाणेश्वर मंदिर , व हारेश्वर मंदिर , बालाजी मंदिर , सोमेश्वर मंदिर , नवशा गणपती मंदिर , रामेश्वर महादेव मंदिर , आसाराम बापु आश्रम , सिद्धेश्वर मंदिर , पवित्र रामकुंड परिसर , टाळकेश्वर मंदिर आदिसह हिंदु धर्मातील धार्मिक स्थळ आहे.

दरम्यान, गोदावरी नदिच्या प्रवाहाकाठी वसलेले गंगापुर गाव ते आसाराम बापु पुल या दरम्यान मिसळणारे सांडपाणी , मानवी मलमुत्र तसेच औदयोगिक क्षेत्रातुन येणारे रासायनिक पाणी हे थेट गोदावरीच्या पात्रात मिसळत असल्याने गोदावरी नदीचे पाणी हे अस्वच्छ , फेसाळलेले व दुषित झालेले आहे. नाशिक महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा विश्व हिन्दू सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा विश्व हिंदू सेनेचे संस्थापक ॲड.महेंद्र शिंदे यांच्यासह डॉ.अमोल वाजे, दत्ता पाटील, कैलास जाधव, अविनाश जाधव, नारायण जाधव, संदीप काळे, प्रवीण पाटील, दीपक आरोटे, विशाल साळवे, आंनद पाटील, अनिल यादव, प्रसाद वाघ, गजानन गायकवाड आदींनी दिला आहे.
“तो” एसटीपी प्रकल्प चुकीच्या जागेवर
गंगापूर गावानजीक उभारण्यात आलेला हा एसटीपी प्रकल्प मुळात बेंडकुळे नगर येथे आरक्षित आहे. मात्र सत्तेचा दुरुपयोग करत अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकल्प गंगापूर गावात उभारण्यात आला. भौगोलिक रित्या चुकीच्या जागेत हा प्रकल्प उभारल्यामुळे प्रदुषित पाणी शुद्ध होवुन पुन्हा नदि प्रवाहात मिश्रण होणे अवघड झालेले आहेत. तसेच त्याभागात अतिशय दुर्गधीयुक्त वास, घाणेचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे परिसरातील नागरीकांना मळमळ , उलटी , त्वचेचे व साथीचे आजार पसरत आहे.
– ॲड.महेंद्र शिंदे, संस्थापक -विश्व हिंदू सेना
