नाशिक मिरर : भारत ग्रेपलर श्री कुस्ती स्पर्धा भगूर, जिल्हा नाशिक येथे दिनांक २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित केल्या असून पहिल्यांदाच ग्रॅपलिंग कुस्ती प्रकारात खुल्या वजनी गटात भारत ग्रेपलिंग श्री हा बहुमान देण्यात येणार आहे.या स्पर्धेत एकूण 12 वजन गटातील असून सर्व गटांना रोख पारितोषिक ज्यामध्ये प्रथम १११०१/- द्वितीय ५१०२/- तर तृतीय २१०१/- रुपये व प्रमाणपत्र तसेच मेडल दिले जाणार आहे.

वरिष्ठ गटातील अजिंक्य खेळाडूस मानाची गदा देण्यात येणार आहे, या स्पर्धेत देशभरातून १५ राज्यातील ४०० पेक्षा अधिक खेळाडू तसेच प्रशिक्षक अधिकारी सहभागी होणार आहे.

या स्पर्धे दरम्यान खेळाडूंची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजन समीतीच्या वतीने करण्यात आली आहे.
बलकवडे व्यायाम शाळा, भगूर येथे महाराष्ट्रातील एकमेव असे अद्यावत स्टेडियम आहे. महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना या स्पर्धेतून आपले कौशल्य दाखविण्याची संधी भारत ग्रुप लेसर श्री या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा मुलं आणि मुली यांची संयुक्तरीत्या खेळविली जाणार आहे,सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या स्वतःकडे असलेले कौशल्य दाखवून भविष्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. अत्यंत नियोजनबद्ध ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या सर्व खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन ग्रुप फ्लीम कुस्ती समिती महाराष्ट्र हे करत आहे. आणि ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आहे की, या स्पर्धे मध्ये कुठल्याही खेळाडूंकडून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. याउलट विजेत्या स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात आकर्षक मानाची चांदीची गदा त्याचबरोबर काही रोख स्वरूपाची तर काही ट्रॉफी च्या माध्यमातून बक्षिसे दिली जाणार आहे.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना कुठेही खुले व्यासपीठ मिळत नाही त्यांना आपल्या स्वतःकडे असलेले कौशल्य दाखविण्याची संधी ही उपलब्ध करुन दिल्या जात नाही. त्यामुळे अनेक खेळाडू कुस्ती या खेळा पासून दूर जात आहे आणि याच गोष्टीचा विचार करून ही स्पर्धा समितीच्या वतीने घेत असून या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कुस्ती महा संघाचे अध्यक्ष खासदार श्री ब्रिजभूषण शरण, ग्रेपलिंग कंमिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कपूर, सचिव बिरजू शर्मा, कोषाध्यक्ष विनोद शर्मा, अंतरराष्ट्रीय पंच जोगेंदर पांचाल, आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू अँड. गोरखनाथ बलकवडे , अशोक दुधारे , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. रवींद्र मोरे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघ, आमदार राहुल ढिकले नाशिक,माजी मंत्री अर्जुन खोतकर,आमदार श्री किशोर दराडे नाशिक, आमदार श्री दिलीप बोरसे सटाणा, आमदार श्री सुहास कांदे नांदगाव, माननीय श्री संजय देठे नगरसेवक जालना, मा. श्री योगेश नवगिरे, मा. श्री गजानन वाळके साहेब, आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक मा.श्री करण गायकर यांनी दिली आहे. याप्रसंगी पत्रकार परिषदेस ग्रॅपलींग कुस्ती कमीटी महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा.राकेश खैरनार, महासचिव प्राध्यापक प्रशांत नवगिरे, कार्याध्यक्ष अँड. अविनाश औटे, श्री मानीक राठोड, अशोक दुधारे,अँड. गोरखनाथ बलकवडे ,प्रा. रवींद्र मोरे,सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव,निवृत्ती शिंदे,भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, गणेश वाघचौरे, वैभव दळवी आदी उपस्थीत होते.

बातम्या

Don`t copy text!