नाशिक मिरर :
सातपूर परिसरात कोविड १९ च्या फैलावापासून गेल्या दोन वर्षात महावितरण च्या ग्राहकाची वीजबिल थकबाकीत वाढ होत आहे. त्यामुळे महावितरणकडून घरगुती वीज कनेक्शन कापण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. कोविड १९ च्या फैलावा मुळे औद्योगिक वसाहती व व्यवसाय बंद होते, अनेकांना हाताला कामच नव्हते, अनेक ग्राहकांना कोविड काळात अंदाजे भरमसाठ बिले देण्यात आली.सदर वाढीव बिले ग्राहकांनी भरलीच नाही.त्यामुळे
सातपूर शहरात सहा महिन्यापासून थकीत बिले आहेत.
महावितरण च्या विद्युत विभागामार्फत वारंवार विद्युत अधिकारी प्रदीप गवई यांच्या गाण्याच्या प्रबोधनातुन व ग्राहकांच्या घरी अधिकारी जाऊन जनजागृती केली. परंतु तरी देखील बिल देयके अदा करण्यात आली नाही. त्यामुळे थकीत वीजबिल असणाऱ्या ग्राहकाचे महावितरणने वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. सातपूर विभागातील एकूण १२५ थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले.गेल्या वेळेस महावितरण ने नागरिकांना टप्प्याटप्प्याने बिलभरण्यासाठी सूट दिली होती. त्यातच काही ग्राहकांनी बिलभरुण सहकार्य देखील केले होते.काही ग्राहकांनी बिल भरलेले नसल्याने अभियंता वट्टमवार व गवई यांच्या सह कर्मचाऱ्यांनी सातपूर परिसरात वीज खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती. तर काही ठिकाणी ग्राहक आपली वीज खंडित होऊ नये म्हणून स्वता अधिकाऱ्यांन समोर आपले राहीलेले बिल भरुण सहकार्य करित आसल्याचे दिसले. वारंवार मागणी करूनही बिल देयके अदा करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने महावितरणने वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.असे विद्युत अभियंता वट्टमवार यांनी सांगितले.
