नाशिक मिरर :

कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ऑफ नाशिक (सी.सी. टी.एफ.एन नाशिक) च्या वतीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकाना पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, युवा आदर्श पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी आपल्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची बैठक अशोकनगर येथील ज्ञानगंगा क्लासेस येथे मोठ्या उत्साहाच्या संपन्न झाली. यावेळी सर्व राज्य प्रतिनिधी जिल्हा कोर कमिटी व सर्व पुरस्कारार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!