नाशिक मिरर :

नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये असमतोल विकास कामे होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांविरोधात रोष व्यक्त केला आहे. प्रभागातील लोकप्रतिनिधी च्या प्रभाव क्षेत्रा बाहेर असलेल्या परिसराकडे गेल्या १० वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

             प्रभाग क्रमांक ९ मधील श्रमिकनगर, माळी कॉलनी,आयटीआय कॉलनी,महाराणा प्रताप चौक, गंगासागरनगर, वृंदावन गार्डन परिसर, कडेपठार चौक, सातमाऊली, विष्णूनगर ,शामलाल गुप्ता हिंदी शाळा व लगतच्या भागातील मूलभूत विकास कामाकडे प्रभागातील जेष्ठ नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

            सदर भागातील मुख्य रस्ता सह कॉलनी रस्ता ची चाळण झाली आहे.खड्डे पडलेल्या ठिकाणी तात्पुरते डांबर अथवा मुरूम टाकला जातो आहे.दर पावसाळ्यात तर पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरते, जागोजागी रस्ताच्या कडेला कचरा ढीग दिसून येतात. धूर फवारणी केली जात नाही.डेंग्यू-चिकनगुणिया चे रुग्ण यांचं परिसरात जास्त सापडले होते. ड्रेनेज तुबण्याचे प्रमाण अधिक आहे.पिण्याचे पाणी कमी दाबाने येते.अशा अनेक मूलभूत समस्या असून तक्रार करून देखील सोडवल्या जात नसल्याने सदर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर परिसरातून मतदान मिळत नाही म्हणून विकास कामे होत नाहीत का ? असा सवाल नागरिकांनी करत सर्व प्रभागाचा समतोल विकास करण्याची मागणी जेष्ठ नगरसेवकाकडे केली आहे.

बातम्या

Don`t copy text!