हत्या की बुडून मृत्यू गूढ कायम ?
नाशिक मिरर : कॉलेज मधील अल्पवयीन युवकांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत शिवाजीनगर पाझर तलावात पाण्यात बुडून मुदफिर मेक्रानी ( वय१६)या अल्पवयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दुपारी १२ च्या दरम्यान घडली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट मधील तरुणानी फोन करत एकमेकांना पाझर तलाव परिसरात बोलावले होते. याच दरम्यान जुन्या वादविवादात दोन युवकाचा मारामारी होत , शिवाजीनगर येथील पाझर तलावात दोन युवक पडले.
यात मुदफिर मेक्रानी( वय १६ रा. संजीव नगर अंबड लिंक रोड) यास खोल पाण्यात बुडून मृत्य झाला आहे.
मयत युवकास याच उपस्थित युवकांनी हाताची साखळी करून पाण्यात उतरत वाचन्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही कैद झाली आहे.घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत पाच अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास वरीष्ठ निरीक्षक रियाझ शेख करत आहे.गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
