नाशिक मिरर वृत्तसेवा: महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोळखांब, शहापुर येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन समाजसेवक, शेतकरी नेते श्री. बबनदादा हरणे यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून झाले, तसेच तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे चिरंजीव युवा नेतृत्व करण दरोडा यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच नाशिक येथून डोळखांब सारख्या अतिदुर्गम भागात येऊन सेवा प्राय: संस्थेच्या डॉक्टरांनी सेवा दिली त्या सर्वांचा सन्मान करण दरोडा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन केले.
ह्या आरोग्य शिबिरात परिसरातील १६७ नागरिकांनी लाभ घेतला, तसेच ज्या रुग्णांना मोठ्या समस्या आहेत तसेच काही रुग्णांची शस्त्रक्रिया झाल्या आहेत, व करायच्या आहेत अश्या रुग्णांच्या वेगळ्या नोंदी करून त्यांना महात्मा फुले योजने अंतर्गत करून देण्याचा सहकार्य केलं जाईल.

या आरोग्य शिबिरासाठी सेवा प्राय चॅरिटेबल ट्रस्ट, चे अध्यक्ष पंकज कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी चौधरी मॅडम, संचालक डॉ कपिल झोटिंग, डॉ मयुर गांगुर्डे, संचालक श्री अजय गव्हाणे, तसेच डोळखांब आरोग्यकेंद्र येथील आरोग्य अधिकारी व स्टाफ यांनी मोलाचं सहकार्य केलं.
ह्या कार्यक्रमासाठी श्री. बबनदादा हरणे, करण दरोडा, सरपंच बारकू वाघ, राष्ट्रवादीचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष गजानन विशे,नामदेव हरणे, रतन शिंदे, कुणबी राजा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भेरे, काळूराम घोडविंदे, वैभव अधिकारी, रमेश हरणे व विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
