सातपूर येथील ललित हायड्राेलिक सिस्टीम कारखान्यात झाला होतो शक्तीशाली स्फोट ; घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई होणार 

नाशिक मिरर : सातपूर अाैद्याेगिक वसाहतीतील हायड्राेलिक सिलेंडर तयार करणाऱ्या ललित हायड्राेलिक सिस्टीम या कारखान्यात शनिवारी दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी शक्तीशाली स्फाेट झाला होतो. सदर स्फाेटात सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. यामधील ३ कामगारांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. रोशनलाल व चंद्रकांत निमसे यांचा मुंबई मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दि.२३ व २४ सप्टेंबर रोजी तर सूरज पेखले यांचा नाशिक मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दि.१ ऑक्टोबर रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. यातील अजून ३ कामगारांवर उपचार सुरू आहेत. नायट्राेजन सिलेंडरची टेस्टींग करताना स्फाेट झाला होतो.


अाैद्याेगिक वसाहतीतील कामगारनगरलगत असलेल्या प्लाॅट नंबर डी- ७१ वर असलेल्या कारखान्यात अाॅइल प्रेशरचे सिलेंडर तयार केले जातात. शनिवारी सायंकाळी कारखान्यात नायट्राेजन सिलेंडरच्या टेस्टींगचे काम सुरु हाेते. यावेळी कारखान्यात ११ कामगार त्या ठिकाणी काम करत हाेते. काम सुरु असतानाच अचानक सिलेंडरचा वाॅल फाटून स्फाेट झाला. या स्फाेटात सहा कामगार गंभीर भाजले होते. मयत कामगारांच्या नातेवाईकानी नुकसानभरपाई ची मागणी केली असून, सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशाेर माेरे यांनी नातेवाईकांनी तक्रार केल्यास त्याच्या वरून कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राजु पठाण करित आहे.

 

सदर घटनेबाबत संपर्क केला असता सदर घटनास्थळी पाहणी केली असून घटना कोणत्या कारणाने झाली. अशा दुर्घटना होऊ नये म्हणे कोणत्या प्रकारची सुरक्षा उपाय योजना करण्यात आली होती.सुरक्षा साधने पुरवण्यात आली होती का ?यासर्व गोष्टीची पाहणी व चौकशी करून काही जणांचे जाब नोंदवले आहे.यावरून येत्या आठ दिवसात अहवाल सादर करून कंपनी मालक व व्यवस्थापन दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-एम.आर.पाटील, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नाशिक विभाग

बातम्या

Don`t copy text!