छावा क्रांतिवीर सेनेच्या पैठण,संभाजीनगर येथे आयोजित ८ व्या महाअधिवेशन तसेच तालुका आढावा बैठक संपन्न

नाशिक मिरर : छावा क्रांतिवीर सेनेच्या पैठण,संभाजीनगर येथे आयोजित ८ व्या महाअधिवेशन तसेच तालुका आढावा बैठक संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दिनेश नरवडे तर डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ राकेश देवरे, आयटी प्रदेश कार्याध्यक्ष वैभव दळवी, नाशिक आयटी जिल्हाध्यक्ष गणेश वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मालेगाव उप जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी पैठण येथे होणाऱ्या आठव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाच्या संदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटना ही तळागाळापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असून ती आपण सर्वांनी एक कर्तव्य म्हणून पार पाडली पाहिजे. येणारे अधिवेशन हे संघटनेचे गत वैभव प्राप्त करणाऱ्या अधिवेशन असेल आठ वर्षांपूर्वी लावलेलं हे संघटनेचे रोपट आज वटवृक्षात तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून येणाऱ्या अधिवेशना साठी मालेगाव तालुक्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांना घेऊन येण्याचे नियोजन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी करायचे आहे.

आज ज्या पदाधिकाऱ्यांना नव्याने नियुक्त्या देत आहोत त्यांची जबाबदारी आजपासून वाढलेली आहे. संघटनेचे पद हे फक्त शोभेचे भावली नसून शेतकरी कामगार महिला विद्यार्थी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली आहे. याचा विचार करून आपण सर्वांनी शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहायचे आहे. आज नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे गायकर यांनी मनापासून अभिनंदन करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

तसेच जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा हा पहिल्यापासून संघटनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे.आणि त्यामध्ये मालेगावचा वाटा हा सिंहाचा असून यापुढेही तो तसाच राहील याची जबाबदारी आज मी तुमच्यावर टाकतो आहे. मी टाकलेली जबाबदारी आपण सार्थ ठरवाल असा शब्द मी संस्थापक अध्यक्ष यांना दिलेला आहे. त्यामुळे आपण काम करत असताना संघटनेला कुठेही बाधा पोहोचणार नाही, संघटनेचे नाव खराब होणार नाही ,याचीही काळजी घ्यायची आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांवर जोरदार आक्रमकपणे आंदोलने करून संघटनेचे नाव आपण तळागाळापर्यंत पोहोचवाल हा मला पूर्ण विश्वास आहे. यावेळी खालील प्रमाणे नवीन नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख मालेगाव विभाग तुषार वाघ, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, तालुका संपर्कप्रमुख संदीप हिरे, युवक तालुकाध्यक्ष तुषार चव्हाण, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समाधान इंगळे, तालुका उपाध्यक्ष अजय पगार, तालुका संघटक जयेश पाटील, तालुका सरचिटणीस दयाराम जाधव, युवक तालुका संपर्कप्रमुख किरण चव्हाण, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष अनिकेत पगार , विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष मालेगाव राधेश्याम सूर्यवंशी, उपशहराध्यक्ष रोहित हिरे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष भूषण सोनवणे, विद्यार्थी आघाडी संघटक शुभम मोरे, विद्यार्थी आघाडी सौंदाणे गटप्रमुख कुणाल शेवाळे यांच्या आज नवनियुक्त केलेले आहेत यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!