नाशिक मिरर :  वृत्तसेवा
सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नविन कार्यकारीणीची निवड दि.२२सोमवार रोजी करण्यात आली.या कार्यकारिणीत सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सातपूर शहराध्यक्षपदी राजू अनमोला व उपाध्यक्षपदी सचिन वरंदळ तसेच खजिनदार पदी छोटु पाटील, चिटणीस पदी शरद पावसे, सरचिटणीसपदी संदिप चौधरी याची एकमताने निवड करण्यात आली.
         नानासाहेब  पावशे व रतन एरंडे,व छबीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.यावेळी माजी अध्यक्ष विनोद कोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नूतन अध्यक्ष राजू अनमोला यांनी देखील सर्व सदस्यांनी विश्वास ठेवून निवड केली त्याबाबत आभार मानत,मिळालेल्या संधीचा सातपूर वृत्तपत्र संघातील सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या बाबत प्रयत्न करणार आहे.व वृत्तपत्र वाटप करतेवेळी येणाऱ्या अडचणी वरिष्ठांपर्यत पोहचवून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
           यावेळी संघटनेचे,संदीप शेवाळे,संदिप जाधव,दिलीप कटारिया,राजू कायस्थ,सुरेश भांड, संजय पाटील,मंगेश एरंडे,संदीप अत्रे,सागर अत्रे,संदीप खैरे, संतोष खैरे,शिंदे मामा ,ललित कटारिया,समिर चौधरी,प्रवीण कोठावदे,पुरूषोत्तम कोर,संदीप पाटील, दिनेश कोठावदे,अक्षय येवले,दिपक जाधव आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!