नाशिक मिरर : वृत्तसेवा 
            ‘तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी ! असा जयघोष करीत सातपूर शिवजन्मोत्सव समिती २०२३ च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा.नगरसेवक दिनकर पाटील, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अध्यक्ष सचिन गांगुर्डे ,कार्याध्यक्ष डॉ.वृषाली सोनवणे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, दीपक वाघचौरे, सचिव धीरज शेळके ,हेमंत घुगे  यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
      यावेळी मा. नगरसेवक दिनकर पाटील यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, सातपूर शिवजन्मोत्सव समिती वतीने यंदा सहावा शिवजन्मोत्सव साजरा होत असून यामध्ये सातपूर व नाशिक मधील सर्व पक्षीय पदाधिकारी व शिवप्रेमी सर्व क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी होतात.यातून सातपूर मधील सामाजिक ऐक्य दिसून येते, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.सचिन गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करून कार्यक्रमाबाबत माहिती दिली. डॉ.वृषाली सोनवणे यांनी उपस्थिताताचे आभार व्यक्त केले.सातपूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्व नियमांचे पालन करून शिस्तीचे पालन करण्यास सांगितले.
     
         यावेळी मा. नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे,रवींद्र धिवरे, मा. नगरसेविका इंदूबाई नागरे, माधुरी बोलकर, तसेच समितीचे नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, देवा जाधव, दीपक लोंढे, संदीप पवार,अँड. महेंद्र शिंदे, रवींद्र देवरे, विजय अहिरे,योगेश गांगुर्डे, गौरव जाधव, समाधान देवरे, गणेश बोलकर, गोकुळ नागरे,संदीप भोजणे, यशवंत पवार, तानाजी निगळ,  नरेश सोनवणे, गीता जाधव, जीवन रायते, किशोर निकम, उद्योजक जी.एस सावळे, दिलीप गिरासे, डॉ.डी.एल.कराड, संजय राऊत,अमोल पाटील, अनिल गडाख, बाळासाहेब जाधव, दीपक मौले, डॉ.अमोल वाजे, कल्पेश कांडेकर,तुषार भंदुरे, इंद्रभान सांगळे, स्वप्नील पाटील, रामहरी संभेराव,निलेश भंदुरे, प्रकाश महाजन, सागर जारे,नाना वाघ आदी सह सातपूर शिवजन्मोत्सव समिती चे  सर्व  सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, शिवप्रेमी, कार्यक्रमास उपस्थित होते

बातम्या

Don`t copy text!