सातपूर येथे महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत ; नेमके हत्या? की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू

नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिकच्या सातपूर परिसरातील विधाते गल्ली या ठिकाणी राहत्या घरात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला असून याबाबतची खबर सातपूर पोलिसांना मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळावर घटनास्थळाचा पंचनामा करायचे काम सुरू आहे.
आता ही आत्महत्या की हत्या याबाबत चौकशी नंतरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे .
सविस्तर असे की सनी बैग हे त्यांच्या परिवारा सोबत तीन दिवसांपूर्वी सातपूर विधाते गल्ली येथे भाडेकरू म्हणुन मध्य प्रदेश येथून रहावयास आले होते मात्र आज दिनांक 26 जून रोजी पहाटे सनी बैग यांना कामाला जाण्यासाठी पहाटे 6 वाजेला डबा करून दिला असता ते कामाला गेले मात्र त्या नंतर असे काय घडले की त्यांची पत्नी यांनी स्वतःचा गळा कापला की कुणी दुसर्‍याने कापला याचा शोध सातपूर पोलीस घेत आहे. बैग यांना त्या पश्चच्यात एक मुलगा एक मुलगी असून महिलेचा पती एका प्रायव्हेट कारखान्यात आहे हे परप्रांतीय कुटुंब असल्याचे समजत आहे. तसेच चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरूपात काही तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या

Don`t copy text!