मा.नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्याने ३० गावामध्ये विकासकामे सुरू
नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक लोकसभा मतदार संघातील इगतपुरी,सिन्नर ,त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या चार तालुक्यातील ३० गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या २५/१५ विकास निधी मधून तब्बल अडीच कोटी रुपये कामांना मंजुरी मिळाली आहे.सदर निधी मधून कामे सुरू देखील झाले आहेत.
नाशिक मनपाचे मा. सभागृह नेते तथा जेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी नाशिक लोकसभा क्षेत्रातील चार तालुक्यामधील ४७३ ग्रामपंचायतिच्या सरपंच ,ग्रामसेवक यांच्या सोबत पोस्टा द्वारे पत्रव्यवहार करून व पाहणी करून आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी सुविधा कामाचे प्रस्ताव मागवले होते. यामध्ये पाटील यांच्या लक्षात आले की,अनेक गावामध्ये रस्ताना पथदीप नाहीत, भुयारी गटार , डांबर व सिमेंट रस्ते, शौचालय, स्मशानभूमी, सभामंडप नाहीत यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी साठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत चे प्रस्ताव विविध गावामधुन जेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कडे आले होते.या सर्व प्रस्ताव बाबत सततचा पाठपुरावा पाटील हे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या कडे करीत होते. ना.महाजन यांनी सदर अभ्यासपूर्ण प्रस्ताव व भाजपा जेष्ठ नेते व नगरसेवक दिनकर पाटील यांचा गावातील गांवकरी यांच्या सोबत असलेला जनसंपर्कचा विचार करून २५ / १२ या विकास निधी मधून अडीच कोटी रुपयांचा निधी गिरीष महाजन यांनी दिली असून सदर कामांना ३० गावामध्ये सुरुवात झाली आहे. सदर विकास कामाना मंजुरी मिळाल्याने गावकऱ्यांनी दिनकर पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी गावातील सरपंच ,ग्रामसेवक यांच्या सोबत पत्रव्यवहार करत होतो.त्यातून आलेल्या प्रस्तावाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. राहिलेल्या गावांना देखील ना.गिरीष महाजन निधी देणार आहेत. ज्या गावाचे प्रस्ताव येणे बाकी आहेत.त्यानी आणून द्यावीत.सदर प्रस्ताव ना.महाजन यांच्या कडून मंजूर करून घेता येतील. – दिनकर पाटील, मा.सभागृह नेते तथा नगरसेवक भाजपा
