नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
कोविड च्या जागतिक महामारीच्या संकटानंतर ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांना तोंड देत आपले शिक्षक ज्ञानदानाचे हे कार्य अखंड सुरू ठेवून राष्ट्रनिर्माणामध्ये मोठा हातभार लावत आहेत. अशा या शिक्षकांप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव यांनी केले.
गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संभाजी सगरे, शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल धनाईत, राजेंद्र निकम, शिवदास म्हसदे,भालचंद सुराणा उपस्थित होते.

डॉ. गायकवाड म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात येत्या काळात आमूलाग्र बदल होणार असल्याने, शिक्षकांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. हे बदल स्विकारण्यासाठी शिक्षकांना माहिती व तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमी अपडेट रहावे लागणार आहे.
मेरी – म्हसरुळ परिसरातील १२५ गुणवंत शिक्षकांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनगर तसेच मेरी म्हसरुळ परिसरातील मित्र परिवाराने प्रयत्न केले.
