नाशिक मिरर : आनंदवली येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक १८ येथे ५ सप्टेंबर ” शिक्षक दिनाचे” औचित्य साधून नगरसेवक संतोष गायकवाड तथा मा. प्रभाग सभापती सातपूर यांच्या वतीने मनपा आनंदवली शाळेतील शिक्षक व मातोश्री रा. शा. वावरे हायस्कूल मधील शिक्षकांचा शाल ,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका राधा बेंडकोळी उपस्थित होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक संतोष गायकवाड यांनी उपस्थित गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत असताना देशाची भावी पिढी घडविण्याचे काम करीत आहेत. आनंदवली परिसरातील आर्थिक परिस्थिती ने दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे व गुणवत्ता परीक्षेत यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन समस्त आनंदवलीकराच्या वतीने या ठिकाणी शिक्षकांचा सत्कार करत आहोत. शिक्षक कैलास ठाकरे मुख्याध्यापक (मनपा शाळा), पंडित सोनार मुख्याध्यापक वावरे हायस्कूल,शिक्षिका वैशाली भामरे ,कुंदा बच्छाव ,वंदना ठाकरे, पूजा बक्षी ,विना देशमुख, पठाण मॅडम, शेख मॅडम, डी एम भुजबळ सर, जाधव एम एम आदी शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपंत बेंडकोळी, विलास आहेर आनंदवली शिवसेना शाखाप्रमुख, विशाल गायकवाड, अविनाश जाधव, संदीप कान्हे , रिजवान खान , अविनाश मोहिते इत्यादी सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आहेर यांनी केले तर अविनाश जाधव यांनी सत्कारमूर्ती व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
