नाशिक मिरर :
विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांनी सुचेता भानोसे- कुलकर्णी हिच्या स्मृती प्रीत्यर्थ घोटी नजीकच्या कानवाई किल्ल्यावर यशस्वी चढाई केली. यावेळी डाँ संदीप भानोसे ह्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून सर्व मावळ्यांमध्ये उर्जा भरली . डाँ संदिप भानोसे, रेणू भानोसे , पूर्वा भालेराव , अजिंक्य तरटे , उमा आईयर ,प्रसंत लोणारी , नाशिकचा सायकलपटू संकेत भानोसे व कावनई चे सरपंच गोपाळ पाटील , नामदेव झेंडे , आनंदा पाटील , चंद्रकांत बांगर , श्रावण झुगारे आदींनी मोहिमे दरम्यान गडावर स्वच्छता मोहीम तसेच १२६० वा सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा दिवस , कोविड सुरक्षा व पर्यावरण रक्षा याबाबत प्रबोधनपर अभियान राबवले
इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे, पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई ,अलंग, मदन , कुलंग,औंढा,पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.
कावनाई किल्ल्याचा दरवाजा आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो. मोहिम यशस्वीतेसाठी डाँ संदिप भानोसे, संगिता भानोसे व रेणू भानोसे आदींनी परीक्षम घेतले.
