केंद्रातील तीन कायदे, जे अमलात आले आहे, चे कायदे शेतकऱ्यावर अन्याय कारक आहे ते रद्द झाले पाहिजे या मागणी साठी बैल जोडीवर शेतकऱ्यांने संदेश लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
नाशिक मिरर : इंदिरानगर प्रतिनिधी तुषार जगताप
पिंपळगाव खांब येथील शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, यांनी पिंपळगाव खांब येथे बैल पोळा साजरा केला, दरवर्षी बैलपोळ्याला वेगळा संदेश देणारे सोमनाथ बोराडे, यांनी याहीवर्षी, वेगळा संदेश दिला आहे, केंद्रीय कृषी कायदे रद्द होऊ दे…. बळीराजाला न्याय मिळू दे..
असे बैलांवर संदेश लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
केंद्रातील तीन कायदे, जे अमलात आले आहे, चे कायदे शेतकऱ्यावर अन्याय कारक आहे ते रद्द झाले पाहिजे असा सोमनाथ बोराडे यांनी सांगितले, सदर हे कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. या कायद्यानुसार जर शेतीमालाला भाव मिळाला तर. व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. आणि भाव नाही मिळाला तर, शेतकऱ्यांची नुकसान होणार आहे, मोठे भांडवलदार पैसे कमावणार आहेत, आणि शेतकरी या शेतीमध्ये गडी म्हणून राहणार आहे, अशी हे कायदे, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, यांनी त्वरीत रद्द करावे, अशी मागणी देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी बैल पोळ्याचे औचित्य साधून बैलपोळ्याच्या माध्यमातून, केंद्राकडून मागणी केली आहे, यानिमित्तानं. बैलांवर झालर लावून. ही बैलजोडी पंचक्रोशीतील चर्चेचा विषय ठरली आहे. सोमनाथ बोराडे पंचक्रोशीतील पिंपळगाव खांब येथील नामांकित शेतकरी आहेत.
