नाशिक मिरर : सातपूर प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्या माध्यमातून प्रभागातील गुंठेवारी मधील नागरिकांचा पाणी पुरवठा योजनेच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला.मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर, पाणी पुरवठा विभाग अधिकारी रवींद्र पाटील, तानाजी निगळ यांच्या उपस्थित जलवाहिनी कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रभागांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभागाच्या नगरसेविका हेमलता कांडेकर काम करत असून, त्यांच्या माध्यमातून नेहमी दुर्लक्षित भागाकडे लक्ष दिले जाते,प्रभागातील नागरिकांना सगळ्या सोयी सुविधा कशा पुरविल्या जातील यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.असे यावेळी सांगितले.
हेमलता कांडेकर यांची प्रतिमा ही प्रभागात त्या नगरसेविका ह्या लोकांची सेवा करण्यासाठी झालेल्या आहेत अशी भावना जनमाणसांमध्ये तयार झालेली आहे, परंतु काही याच प्रभागातील नगरसेवक म्हणजे प्रभागाचे मालक झाले अशा पद्धतीने वागतात त्यांच्या या पद्धतीला जोरदार विरोध करत प्रभाग म्हणजे हे कुटुंब आहे. त्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी आपण निवडून आलेला आहोत या भावनेतून ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून हेमलता कांडेकर सोडवत आहेत. प्रभागातील जनतेने सुद्धा आता यापुढे लोकप्रतिनिधी निवडताना जनतेचे प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी निवडावेत, गुंठेवारी ला विरोध करून अतिक्रमण म्हणणारे आता या ठिकाणी दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्यासाठी येतात लोकांची दिशाभूल करतात परंतु प्रभागातील जनता आता सूज्ञ झालेली आहे.येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टी चा हिशोब केल्या शिवाय जनता राहणार नाही असे त्यांनी यावेळी कार्यक्रम प्रसंगी बोलताना गायकर यांनी सांगितले.
माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते सदाशिव माळी यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आता उभे न राहता सर्वसामान्य जनतेचा विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे रहा इथून मागे जे झालं ते सोडून द्या असे सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, निवृत्ती शिंदे, प्रमोद जाधव , वसंत पाटील, सचिन मोहिते, मनिषा गांगुर्डे, मंगला खोटरे,वैभव दळवी, बाळासाहेब हिरे, गणेश वाकचौरे, सागर वैष्णव,विलास गायकवाड, दिनेश झोडगे, विक्रांत छल्लारे, गोविंद चव्हाण,अशोक यशवंते, नारायण मोळीक, भीमराव भालेराव आदींसह प्रभागातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक महिला उपस्थित होते.
