नाशिक मिरर : नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा सुरू होऊन महिना ही पूर्ण होत तोच टवाळखोराचा उपद्रव सुरू झाला आहे.श्रमिकनगर येथे बस ची काच फोडून वाहनचालकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. सातपूर येथे सीटीलिंक नंबर एम एच १५ जी व्ही ७९३९ तपोवन ते श्रमिक नगर रुट वर असतांना श्रमिक नगरच्या बस स्टाँप वर थांबली होती.

बस ड्रायव्हर ने दरवाजा नेहमी प्रमाणे प्रवासी भरण्यासाठी उघडा केला आसता, परिसरातील एक टवाळखोर मद्यपान करून बस मध्ये चढत होतो. मात्र बस मध्ये येत आसलेल्या टवाळखोरा कडून बस मधूनच वाहनचालकाला शिविगाळ सुरु केली.त्यावर वाहनचालकाने टवाळखोर म्हणून दृलक्ष केले. शिव्या देणाऱ्या टवाळखोरास उशीर होत असल्याने बस चालक विनंती करत असता बस च्या आतल्या बाजूने दगड फेकून बसची काच फोडली. वाहनचालक बस चे नुकसान झाले म्हणून खाली बघण्यासाठी गेला असता वाहमचालकास देखील दगड मारुण जखमी केले. यात बस चालकाच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. या नंतर मारझोड करणाऱ्या युवकाचे मित्र आले असता या सर्वांनी मिळवून देखील मारझोड केली. यामुळे संबधीत टवाळखोरा विरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये सरकारी मालमत्तेस नुकसान व वाहनचालकास मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सातपुर पोलिस करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!