नाशिक मिरर : सातपूर प्रतिनिधी
राहत असलेल्या घरी गळफास घेऊन एका विवाहित महिलेने ओढणीच्या सहाय्याने घराच्या पत्र्याच्या छताला लटकुन आत्महत्या केली.सदर घटना सातपूर परिसरातील महादेव वाडी मधील सप्तशृंगी चौक येथे सोमवारी सायंकाळी घडली.
वनीता त्र्यंबक पवार (वय २९), असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. महिलेने आत्महत्या का केली यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
