नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर गुरू शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती च्या वतीने दि.११ रोजी सायंकाळी ८ वाजता जाणता राजा मैदान,सावरकर नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सातपूर विभागाच्या वतीने गुरू शिष्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषाच्या विचारधारे आधारित मराठी रंगभूमीवरील दिगग्ज कलाकारांचे मऱ्हाठमोळे सादरीकरण लोककला महाराष्ट्राची हा कार्यक्रम झी मराठी फेम अमोल पालेकर यांनी सादर केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या पुतळ्यास प्रकाश खैरनार अध्यक्ष, इंदूबाई नागरे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.गणेश वंदना ने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतामाचे, प्रथम नमो गौतमा,गवळण मथरूच्या बाजारी कशी ग जाऊ, माझ्या राजार,शेतकरी गीत ताणल्या रानात सुरू झाली पेरण,भीमराज की बेटी मे तो जय भीम वाली हु,शिवरायांची तलवार ,पोवाडे,सावित्री-ज्योतिबा फुले असे एकना-एक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर आधारित गीत सादर करण्यात आले.
सदर गीता व नृत्य सादरीकरनाणे उपस्थित प्रेक्षकांची वाववा मिळवली. कार्यक्रमाचे संयोजन योगेश कमोद यांनी केले होते. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गिरकर , स्व. निळू फुले यांची कन्या व अभिनेत्री गार्गी फुले, पार्श्वगायक चेतन लोखंडे, गायिका श्रावणी महाजन यांची प्रमुख उपस्थितीती होती.मोना डोंगरे समूहाच्या कलाकारांनी नृत्य सादरीकरण केले.लावणी नृत्यांगना चैताली पानसरे यांनी लावणी सादर केल्या.
कार्यक्रमाचे निवेदन आरजे श्रेयस यांनी केले.प्रकाश महाजन इंजि.प्रवीण नागरे यांनी सूत्रसंचालन केले.कोअर कमिटी सदस्य श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर,दीपक गांगुर्डे, समाधान तिवडे, भारत जाधव, अनिल माळी, गोकुळ तिडके,राहुल साळुंखे, यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. अशोक पारखे, अँड. कांचन तूपलोंढे, तुषार भंदुरे, अर्जुन धोत्रे, गुलाब माळी, भागवत देवरे, ज्ञानेश्वर थोरात ,जुनेद शेख,कल्पेश कांडेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
भाग्यश्री बनायत, अतिरिक्त आयुक्त मनपा, पंकज भालेराव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर, मा. महापौर दशरथ पाटील, मा. नगरसेवक प्रकाश लोंढे,सलीम शेख,योगेश शेवरे, कांडेकर,माधुरी बोलकर, मा. सभापती सदाशिव माळी, स्वराज संघटना प्रमुख करण गायकर, डॉ.डी. एल.कराड, गणेश बोलकर, शिवाजी माळी, नितीन निगळ, इंद्रभान सांगळे, भिवानंद काळे, दीपक मौले, धीरज शेळके, अँड देवमन शिंदे, प्रेम पाटील,डॉ.वृषाली सोनवणे, बाळासाहेब भोजने आदीसह सातपूर व नाशिक मधील सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक सामाजिक संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


