नाशिक मिरर- भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार या कुळाविषयी अपमानजनक, बदनामीकारक आणि धमकीचे वक्तव्य केलेले आहे, पवार आडनावाबद्दल पडळकर यांनी बुद्धी पुरस्कर व दुष्ट भावनेच्या उद्देशाने भाष्य केलेले आहे, यामुळे महाराष्ट्रातील समस्त पवार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समस्त पवार वर्गाची बदनामी झालेली आहे, त्यामुळे लोक आमच्याकडे तिरस्कार नजरेने पाहत आहेत, यातून पवार वर्गाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे, म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भादवि कलम २९५अ व २९८ या तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही समस्त पवार, नाशिककरांच्या वतीने करीत आहोत, याचे निवेदन नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देण्यात आले.

ह्यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानाचे जिल्हा अध्यक्ष आशुतोष पवार तसेच चंदन पवार, प्रवीण पवार,संजय पवार,दत्ता पवार, नितीन पवार, राजेश पवार,अनिरुद्ध पवार ई. पवार हजार होते.

बातम्या

Don`t copy text!