सातपूर : सातपूर व जानोरी औद्योगिक वसाहती मधील युके मेटल इंडस्ट्रीज प्रा.ली व मनचंदा कोल्ड स्टोरेज च्या वतीने आषाढी एकादशी उत्सवात साजरी करण्यात आली. कंपनी परिसरात विठ्ठल-रुक्मिणी गणपतीच्या भव्य-दिव्य मंदिराचे काम नुकतेच मार्च महिन्यात काम पूर्ण झाले आहे.मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण ग्रॅनाईट मध्ये आहे.आषाढी एकादशी निमित्त कंपनीमधील कामगारांनी मंदिराची विविध प्रकारच्या फुलांनी आकर्षक सजावट केली होती.सदर सजावट सर्वांचे मनमोहुन टाकत होते. सकाळी 9 वाजता विठ्ठल-रुक्मिणी यांचा महाअभिषेक करण्यात आला.गुरुजी वेदमूर्ती उमेश जोशी, प्रणव जाखडी यांनी मंत्रउच्चार केले. त्यानंतर परिसरातुन पायी पालखी यात्रा काढण्यात आली होती. सिद्धेश्वर भजनी मंडळ प्रमुख राजेंद्र महाराज गायके आणि भजनी मंडळी यांनी अभंग व भजनाचे गायन केले. टाळ-मृदंगाच्या तालावर सहभागी भाविकांनी नाचण्याचा व फुगड्या खेळण्याचा आंनद लुटला.संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणात न्याहून निघाला होता. सुप्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांचा भक्तिमय गीताचा कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते.कार्यक्रमाचे आयोजन युके मेटल इंडस्ट्रीज चे संचालक राजेंद्र कातोरे, मनचंदा कोल्ड स्टोरेज चे संचालक भोजराज मनचंदा, किशोर मनचंदा ,दीपक मनचंदा यांनी केले होते. कंपनीचे व्यवस्थापक दीपक पाटील, अमोल तारगे, सुनील मराठे संजय क्षीरसागर ,प्रशांत पाटील व कंपनीतील कामगारांनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.


