जळगांव : नाशिक मिरर वेबटीम भुसावळ शहरात रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराच्या अफवेनंतर रस्ता लूट करण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी भारत वाडेकर याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ही घटना घटना मंगळवार (ता. 17) गोदावरी रुग्णालयात घडली. नशिराबाद पोलिस स्टेशनला यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नशिराबाद पोलिस स्टेशन मधून देण्यात आली.भरत वाडेकर या संशयीत आरोपीला पोलिस शोधत होते. वाडेकर वसुबारसच्या रोजी स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस झोपला. रात्री झोपेत त्याला सर्पदंश झाला. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष केले. विषबाधा वाढत गेल्याने . तो स्वतःहून 15 रोजी गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याचा मंगळवार उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला डॉ . श्रीकांत जाधव यांच्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही नोंद शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.

बातम्या

Don`t copy text!