५ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास कारवाई

जळगाव : नाशिक मिरर वेबटीम जळगाव जिल्ह्यात कोरोना वाढता विळखा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये. यासाठी जिल्ह्यात ७ डिसेंबर पर्यंत ३७ पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास किंवा एकत्र येण्यास बंदी आहे, स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना तसेच शासकीय कार्यक्रम, लग्न मिरवणुका,धार्मिक मिरवणुका व प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्या

Don`t copy text!