नाशिक मिरर वेबटीम :  मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचे असून कोणा एकट्याच्या बापाचे नाही, त्यामुळे भविष्यातील मराठा समाजाच्या प्रगती व उन्नती साठी आज आरक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी मराठी समाज बांधव आरक्षण पासून वंचीत असुन त्यामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी ठिकाणी मागे पडत आहे. आरक्षण आजपर्यंत दिले गेलेले आरक्षण इतर जातींना का देण्यात आले ? व कशाच्या आधारावर देण्यात आले ? त्याचे निकष काय होते ? त्यासाठी कुठला आयोग स्थापन करण्यात आला होता का ? सदर आयोग हा संविधानिक होता का ? आरक्षणाची मर्यादा ५०% असताना ती ५२% कशी करण्यात आली ? त्यासाठी संविधानात तरतूद होती का ? या सारखे प्रश्न मराठा समाजाने आज पर्यंत कधीही ईतर समाजाला विचारले नाही. किंवा त्याविरोधात कधी कोर्टात धाव घेतली नाही. इतरांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागू दिला नाही किंवा त्यावर कुठलीही आच आणली नाही, मग आज मराठा समाजाची अवस्था ही दैनिय असताना तसेच संपूर्ण संविधानिक मार्गाने मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्यास कृपया कोणीही विरोध करु नये, अशी सामाजिक आर्त हाक छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला  केली असून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकांनी पाठींबा द्यावा अशी मागणी देखील गायकर यांनी केली आहे.

मराठा समाजाने कधीही कुणाला विरोध केला नाही त्यामुळे मराठा समाजाला कुणीही विरोध करण्याचे कारण नाही,
आम्ही कुणाच्या हक्काचे मागत नाही तर आमच्या हक्काचे कुणाला देणार पण नाही आणि जे हक्काचे आहे ते घेतल्याशिवाय शांत देखील बसणार नाही. असे देखील आवर्जून सांगितले आहे.भारतीय राज्य घटनेत सर्वांना अधिकार दिले आहेत.त्यामुळे कुणाच्या तरी सांगण्यावरून मराठा आरक्षणाला विरोध करुन जातीय तणाव निर्माण करु नये.
– करण गायकर , मराठा क्रांती मोर्चा ,जिल्हा समन्वयक

बातम्या

Don`t copy text!