नाशिक मिरर वृत्तसेवा : माघी गणेश जयंती निमित्त शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सिध्देश बागुल व बागुल परिवारातर्फे भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहजानंद पार्क,पंचवटी, निमानी,आडगाव नाका, या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र बागुल,रमेश जाधव, उल्हास धनवटे, गुलाब भोये, सचिन ढिकले, हर्षद पटेल, प्रविण भाटे, विशाल गौवधने,दिंगबर धुमाळ, राहूल बोडके, दिपक चव्हाण, गोंविद गरकळ, प्रमोद मराठे, जगण गरकळ, मनोज कोकरे, तुषार नाटकर, संजय अंभग, मिहीर घोडके,प्रमोद लासुरे, अविनाश ढाकणे, या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
