नाशिक मिरर :

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्बन नाका म्हसोबा मंदिर येथे दोघांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यास युनियन च्या वादातून धारदार शस्त्राने मारून हत्या केल्यानंतर सातपूर पोलिसांनी आरोपीस अवघ्या सहा तासात अटक केली होती. तर आज शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ५ डिंसेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातपूर शिवाजी नगर येथील कार्बन नाका म्हसोबा मंदिर येथे शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी अमोल ईघे. व विनायक बर्वे या दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच बर्वे यांनी ईघे यांना धारदार शस्त्राने हल्ला केला. यातच ईघे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संशयित आरोपी हा फरार झाला होता. या नंतर पोलिसांनी संशयित आरोपी शोधण्यासाठी यंत्रणा राबवली पोलिसांनी गुप्तचाराच्या माध्यमातून आरोपी मुंबईच्या दिशेने आहे.

असे समजले असता सातपूर डिबी पथकाने आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर विनायक (उर्फ) विनोद बर्वे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी आरोपीस अटक करून शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने आरोपीस पाच तारखे पर्यत पोलीस कोठडी सुनावली.

बातम्या

Don`t copy text!