सातपूर गावठाण परिसरातील प्रकार

नाशिक मिरर वृतसेवा :  सातपूर  गावातील रस्त्याची झालेली दुरवस्था, ड्रेनेज लाईन, जलवाहिनी आदी समस्या सोडविण्यासाठी प्रभाग ११ मधील नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे,दीक्षा लोंढे,सीमा निगळ यांनी विशेष निधी मंजूर करून लाखो रुपये खर्च करून नाशिक मनपा प्रशासनाने सातपूर गावठाण परिसरात सिमेंट चे रस्ते २०१८ मध्ये बांधले आहेत. परंतु हेच रस्ते ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी फोडण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरु असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सातपूर गावातील काळे चौक,शिवशक्ती चौक,कोळीवाडा,शिवाजी चौक मधून सदर रस्ते बाधण्यात आले आहे. परंतु सदर भागात ड्रेनेज लाईन कमी व्यासाची असल्याने ड्रेनेज लाईन तुंबण्याची समस्या मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक मनपा प्रशासनाकडे सतत तक्रार करीत होते. मनपा प्रशासनाने त्यावर उपाय म्हणून पहिले होती त्याच व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम भुयारी गटार योजने अंतर्गत सुरु आहे.यामुळे समस्या सुटण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही.  परंतु यासाठी काही वर्षा पूर्वीच तयार केलेले लाखो रुपयेचे रस्ते फोडले जात आहे. एककडे गावठाण विकासासाठी खेडे विकास निधी मिळत नसल्याची तक्रार केली जात असते. तर दुसरीकडे मनपा प्रशासन अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागून नागरिकाच्या करातून मिळणाऱ्या पैसेची उधळपट्टी करत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील रहिवासी शाम आहेर,सुनील निगळ,बाबू कालवे  आदीसह परिसरातील नागरिकांनी फोडण्यात आलेले रस्ते पूर्ववत करून देण्याची व पहिल्या पेक्षा जास्त व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी केली आहे.
सातपूर : १.फोडण्या अगोदरचा सिमेंटचा रस्ता
सातपूर गावातील चांगले सुस्थितीत असलेले सिमेंट चे रस्ते फोडण्याचे काम करून नाशिक मनपा प्रशासन नागरिकाच्या पैसेची एकप्रकारे उधळपट्टी करत आहे. अगोदरची अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने मोठी लाईन टाकणे आवश्यक होती. परंतु मनपा प्रशासन आहे तीच लाईन पुन्हा टाकत आहे. मनपा अधिकारी व ठेकेदार कामातून मिळणाऱ्या टक्केवारी साठी असले काम करीत आहेत.
– नितीन (बाळा) निगळ,अध्यक्ष : नाशिक पश्चिम विधानसभा रा.यु.कॉ.

बातम्या

Don`t copy text!