मनसेचे गटनेते सलीम शेख यांची दोषींवर कारवाईची मागणी
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक विभागातील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागांचे एमआयडीसी मधील एजंट हे शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून जागा विक्री मध्ये गैरव्यवहार करत आहे. यामुळे गरजू व होतकरू नवीन उद्योजक, मोठे उद्योग ज्यांना विस्तार करायचा आहे अशा उद्योगांना जागा मिळत नाही त्यामुळे ते दुसऱ्या राज्यात व शहरात स्थलांतर होत आहे. सदर बाबी कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक मनपा गटनेते सलीम शेख यांनी एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदन देऊन दोषी अधिकारी व जमीन मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर,माळेगाव औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्रमांक ऐ ७७ हा एकूण ४२ एकर चा भूखंड मुकुंद स्टील लिमिटेड आस्थापनेला अलोट करण्यात आला आहे. करण्यासाठी देण्यात आला आहे सदर कंपनी ने विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करून बांधकाम पूर्णतः दाखला घेऊन आपले उत्पादन चालू करणे आवश्यक होते. त्या प्रमाणे दिखाव्या साठी बांधकाम करून दाखला मिळवला. परंतु सदर ठिकाणी उद्योग सुरू झाला च नाही.यामुळे तरुण रोजगार पासून वंचीत राहिले.नवीन उद्योजक यांना संधी मिळाली नाही. तसेच औद्योगिक वसाहती मध्ये बांधकाम व्यावसायिक यांनी नामपात्र किंमती मध्ये जमीन खरेदी करून नंतर त्याचे छोटे प्लॉट पाडून व एजंट ,शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून ४ ते ५ हजार चौ.मी दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊन आर्थिक फायदा करून घेतला जात आहे.

सातपूर एमआयडीसी मधील शालिमार वायर, एशियन फुटस,बीसीएल फोर्जिंग, व अंबड एमआयडीसी मधील मेल्टान कंपनी ,सुमित कंपनी या अनेक वर्षापासून बंद आहेत.त्यामुळे नवीन उद्योग येणास जागा असून देखील केवळ जागा नाही हे कारण सांगितले जाते.या जागा ताब्यात घेऊन होतकरू उद्योजक यांना दिले तर नवीन रोजगार उपलब्ध होतील. सदर बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ गैरप्रकार थांबवावे,व बंद पडलेल्या कारखान्यांचे जागा ताब्यात घेऊन नवीन उद्योग यांना उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा अन्याय ग्रस्त उद्योजक यांच्या मार्फत जन औद्योगिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला आहे.
